breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

यंदा महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष, मोदींना मागे टाकत पाहा कुणी घेतल्या सर्वाधिक सभा

मुंबई : येत्या ४ जूनला देशाच्या सत्तेवर कोण विराजमान होणार. याचा फैसला होणार आहे. आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार थांबला आहे. १ जून शेवटच्या टप्प्यातल्या मतदानानंतर साऱ्या देशाला ४ जूनच्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान प्रचारात कोण आघाडीवर राहिलं. उपलब्ध माहितीनुसार कुणी किती सभा घेतल्या पाहूयात.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. 1 जून ला अवघ्या ५७ लोकसभा जागांसाठी मतदान होईल आणि ४ जूनला देशाच्या सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात कुणी किती सभा घेतल्या याची आकडेवारी पाहिली तर माहितीनुसार, राज्यात नरेंद्र मोदींनी 18 हून जास्त सभा घेतल्या. अमित शाहांनी 11, राहुल गांधींनी 3, प्रियंका गांधींनी 2 तर अरविंद केजरीवालांनी 2 सभा घेतल्या.

देवेंद्र फडणवीसांनी रोड शो मिळून 100 हून अधिक ठिकाणी सभा घेतल्या. शरद पवारांच्या 60 हून अधिक सभा तर अजित पवारांनी 20 हून अधिक ठिकाणी सभा केल्या. काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या 50 हून अधिक सभा झाल्या. एकनाथ शिंदेंनी रोड शो मिळून 40 हून जास्त ठिकाणी सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंनी 30 हून अधिक तर राज ठाकरेंनी महायुतीसाठी 4 सभा केल्या.

हेही वाचा – नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी मोदी करणार का? विजयाची गुरुकिल्ली या राज्यांच्या हाती!

अब की बार, 400 पार….आणि मोदी की गँरटी हा भाजपच्या प्रचाराचा नारा होता. तर हाथ बदलेगा हालात….या टॅगलाईननं काँग्रेसनं प्रचार केला.अमित शाहांचा दावा आहे की पाचव्या टप्प्यातच भाजपनं ३०० हून जास्त जागांचं बहुमत मिळवलं आहे. तर इंडिया आघाडीचा दावा आहे की ४ जूननंतरच्या ४८ तासांआधीच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाचं नावं जाहीर होईल.

नेत्यांपैकी देशात सर्वाधिक सभा कुणी घेतल्या यात बिहारचे तेजस्वी यादव सर्वाधिक आघाडीवर राहिले. संपूर्ण देशात तेजस्वी यादवांनी 250 हून जास्त सभा घेतल्या. नरेंद्र मोदींनी 172, प्रियंका गांधींनी 140, अमित शाहांनी 115, राहुल गांधींनी 107, मल्लिकार्जुन खरगेंनी 100 हून अधिक, जे.पी.नड्डा 87, अखिलेश यादवांनी 73 आणि ममता बॅनर्जींनी 69 सभा केल्या.

एरव्ही लोकसभा निवडणुकांवेळी उत्तर प्रदेशचा कौल कुणाच्या बाजूनं असणार याची देशात सर्वाधिक उत्सुकता असते. मात्र यंदा उत्तर प्रदेशबरोबरच महाराष्ट्रात काय होणार. याकडेही देशाचं लक्ष लागलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button